पोस्ट्स

सेंद्रिय खत लेबलसह पोस्ट दाखवत आहे

घरच्या घरी कंपोस्ट खत कसे तयार करावे?

इमेज
  घरच्या घरी कंपोस्ट खत कसे तयार करावे? मित्रांनो,मी तुमचा शेतकरी मित्र हर्षल , आजकाल शेतीत खूप जास्त chemicals चा वापर होत आहे या ने शेती करणे खूप सोपे झाले असेल पण अन्नाची गुणवत्ता कमी होत चालली आहे ! या मुळे लोकांना कितीतरी रोग होत आहेत पण यात चांगली बातमी ही की लोकांना ही बाब समजायला लागले आहे. उशीरा का होईना लोक निसर्गाच्या जवळ येत चालली आहेत! यात वाढ व्हावी यासाठी माझी थोडे प्रयत्न आहेत.   आपल्या घराच्या कचर्‍याचं काय होतं, याचा कधी विचार केलाय का? आपल्यापैकी अनेक जण घरातील सेंद्रिय कचरा थेट कचरापेटीत टाकतात .पण, या कचऱ्याचा उपयोग जर खतासाठी केला तर? आपल्यालाच चांगले व नैसर्गिक अन्न मिळेल, आपल्या मातीत सुधारणा होईल, आणि पर्यावरणाचं रक्षणही होईल. चला, आपण कंपोस्ट खत तयार करण्याची सोपी पद्धत समजून घेऊया. कंपोस्ट खत म्हणजे काय? कंपोस्ट म्हणजे नैसर्गिक सेंद्रिय खत. आपल्या घरातील भाज्यांचे साली, फळांचे टरफले, चहा पावडर, अन्नाचे शिळे तुकडे, गवत, वाळलेली पाने यांसारख्या गोष्टींपासून हे खत तयार करता येते. यामुळे मातीची सुपीकता वाढते आणि ती पूर्णपणे नैसर्गिक असल्याने पिकांस...